ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्विफ्ट डिझायरला अपघात एक ठार दोन जखमी

बाळापूर रस्त्यावरील शिवसागर तुकूम गावासमोरील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

             ब्रम्हपुरी तालुक्यातील बाळापूर रस्त्यावरील शिवसागर तुकूम गावसमोर रस्त्यावर स्विफ्ट डिझायर गाडी क्र.एमएच ३४ के ८२५४ या वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर वाहन झाडाला धडक दिली व पलटी झाली या भीषण अपघात एक ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार वाहनचालक चेतन लालाजी पटेल(29) पटेलनगर ब्रम्हपुरी,हे आपले मित्र शुभम विठ्ठलराव मैद व मुकेश माथूर सरकार रा.ब्रम्हपुरी यांच्या सोबत चारचाकी वाहनाने जात असताना वाहनवरील नियंत्रण सुटल्याने झाडाला धडक मारली असता मुकेश माथूर सरकार याचा जागीच मृत्यू झाला.

तर शुभम मैद व चेतन पटेल हे दोघेही गंभीर जखमी झाले.सदर घटनेत दोषी असलेला चालक चेतन पटेल यावर अप. क्र. ५२/२०२४ कलम २७९, ३३७,३३८,३०४ (अ) आयपीसी, कम सी. 184 मोवाका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये