ताज्या घडामोडी

चंद्रपूरच्या भूमीला होणार शंकराचार्यांचे पुण्य पदस्पर्श – दोन दिवस होणार स्वागत व विराट दर्शन सोहळा

दिनांक 24 व 25 जुन रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर शहरात प्रथमच श्री विभूषित दक्षिनाम्नाय श्री श्रृंगेरी शिवगंगा पीठाधीश्वर जगद्गुूरु शंकराचार्य पुरुषोत्तम भारती स्वामी यांचे विजय यात्रेकरीता आगमन होत आहे. यानिमित्त शंकराचार्य स्वागत समारोह समिती बाबुपेठ, चंद्रपूर तर्फे 24 व 25 जून रोजी बाबुपेठ येथील बालाजी मंदिर येथे द्वि दिवसीय विविध कार्यक्रमांचे अयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी 24 जून रोजी सायंकाळी 4 वाजता स्वागत समारोह व शोभायात्रा बालाजी मंदिर येथून गुरु भवन (श्रीमाधव महाराज निवासस्थान) पर्यंत निघणार आहे. सायंकाळी 7 ते 8 या वेळात शंकराचार्यांद्वारे चंद्रमौलीश्वर पूजन होईल. रविवारी 25 जून रोजी सकाळी 8 ते 12 या वेळात पाद्यपूजन, धर्मोपदेश, आशीर्वचन व दर्शनाचा सोहळा होईल.

या भव्य आयोजनादरम्यान जगद्गुरु शंकराचार्य यांच्या पावन सानिध्यात राहण्याचा योग चंद्रपूरकरांना लाभला आहे. या कार्यक्रमाचा सनातन धर्मप्रेमी, भक्तगण व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजन समितीद्वारे करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये