ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा असलेल्या गोदामावर पोलिसांचा छापा

एकूण २ लाख ३७ हजारावर माल जप्त ; आरोपी अटकेत

चांदा ब्लास्ट

गजानन चांदेकर ह्यांच्या मालकीच्या, ग्रामनेरी शेतशिवारात असलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधीत अवैध सुगंधी तंबाखू साठवून ठेवला असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने धाड घालुन मोठ्या प्रमाणावर अवैध सुगंधी तंबाखू तसेच पानमसाला (अंदाजित किंमत रुपये २ लाख ३७ हजार ६४५) जप्त केला असून दोन आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, दि. २१/२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त गुप्त माहीतीच्या आधारे ग्राम नेरी शेतशिवारातील गजानन चांदेकर यांचे गोदामावर छापा टाकला असता, त्या ठिकाणी 114800/- रुपये किंमतीचा होला हुक्का शिशा नामक प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू 11 प्लॅस्टीक चुंगडीत 200 ग्रॅम वजनाच्या 700 पुडके, 27960/- रुपये किमतीचा मुसाफिर पानमसाल्याचे 233 पुडे, 400 ग्रॅम वजनाच्या पॅकिंग मधे असलेला एकूण 6400/- रुपये किंमतीचा 10 पुडे व 200 ग्रॅम वजनाचे 8 पुडे एकूण किंमत 2720/- इगल हुक्का, शिशा तम्बाखू, माजा 108 ब्रँडचे 17365/- रुपये किंमतीचे 200 ग्रॅमचे 23 डबे, प्लॅस्टिकच्या दोन चुंगळीत असलेले 32900/- रुपयांचे 50 ग्रॅम वजनाचे 140 डबे, एका चुंगळीत 29500/- रुपयांचे 25 खरड्याच्या डब्यात असलेला रजनीगंधा व 6000 रुपयांचा 50 पुड्यात असलेला पान पराग पान मसाला असा एकूण २ लाख ३७ हजार ६४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लोकांच्या जिवीताला हानीकारक नशाकारक व अहितकारक अन्न पदार्थ सुगंधित तंबाखू व पान मसाला अवैद्यरित्या आपले ताब्यात अवैधरीत्या विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याने त्यांचेवर अप.क.९१/२०२४ कलम ३२८,१८८,२७२,२७३,३४ भादवी सहकलम ३०(२), २६(२), (अ), ३,४,५९ (१) अन्न व औषधी कायदा २००६ अन्वये गुन्हा नोंद करून जप्त मुददेमाल व आरोपी जगदीश काशिनाथ आष्टनकर वय ४३ वर्षे धंदा- किराणा दुकान मालक रा. टिळक वार्ड, नेरी ता. चिमूर जि. चंद्रपूर व आदिल कुरेशी, रा. नागभीड यांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून चिमूर पोलिसांच्या स्वाधीन केले असुन चिमूर पोलीस पुढील तपास करीत आहे.

सदर यशस्वी कारवाई पोलीस अधिक्षक, चंद्रपूर एम. सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, महेश कोंडावार, पोलिस निरिक्षक, स्थागुशा चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली किशोर शेरकी, सपोनि, स्थागुशा चंद्रपूर, पोहवा सुरेंद्र महतो, पोहवा दिपक डोंगरे, नापोशि गणेश मोहुर्ले, पोअ गोपीनाथ नरोटे, पोअ सतिश बगमारे, यांनी पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये