गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिगडोह नदी रोडवरील देवळी टाऊन येथे चोरटी रेती वाहतूकीवर रेड

एकूण कि. 20 लाख 70 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज रोजी विशेष पथक स्था. गु. शा. वर्धा ने पो.स्टे. देवळी हद्दीत दिगडोह नदी रोड वरील देवळी टाऊन येथे चोरटी रेती वाहतूकि वर रेड करून एकूण 20,70,000/- मुद्देमाल जप्त करून आरोपी 1) चालक व मालक मंगेश विजयराव तायवाडे, वय 24 वर्षे, रा. थोडगे मंदिर जवळ ठाकरे पुरा देवळी.2) चालक- रुपेश मनोहर फटिंग, वय 30 वर्षे, रा. म्हाडा कॉलनी देवळी.3) मालक- उमेश सरकार रा. गोमासे चौक, देवळी यास अटक करून जप्त मुद्देमाल

1) एक लाल रंगाचे नवीन RTO पासिंग नंबर नसलेले महिंद्रा ट्रक्टर क्र. MH 32 TC 025 किंमत 8,00,000/-₹

2) लाल रंगाची नवीन RTO पासींग नं. नसलेली ट्रॉली क्र. MH 32 TC 026 किँमत 2,30,000/- ₹

3) ट्रॉली मध्ये एक ब्रास रेती किंमत 5000/- ₹

4) एक लाल रंगाचे नवीन RTO पासिंग नंबर नसलेले महिंद्रा अर्जुन ट्रक्टर किंमत 8,00,000/- ₹

5) लाल रंगाची नवीन RTO पासींग नं. नसलेली ट्रॉली क्र. MH32TC 026 किँमत 2,30,000/-₹

6) ट्रॉली मध्ये एक ब्रास रेती किंमत 5000/-₹

असे दोन ट्रॅक्टर व त्याला जोडून असलेली ट्राली मध्ये दोन ब्रास रेती असा एकूण किँमत 20,70,000/-₹ चा मुद्देमाल पकडुन मुद्देमाल व आरोपी पो. स्टे.देवळी चे ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अंम. अभिजित गावंडे, संदिप गावंडे, केलास वालदे, प्रदीप कूचनकर, सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा तसेच चालक पो.अ. शुभम बहादुरे, पो.मु. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये