ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी पदावर देवेंद्र आर्य यांची नियुक्ती.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशाने प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार चंद्रपूर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुभाष भाऊ धोटे यांनी माजी गटनेते देवेंद्र सत्यदेव आर्य यांना बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. या अगोदर बल्लारपूर शहर अध्यक्ष अब्दुल करीम हे होते . देवेंद्र आर्य यांनी आपल्या या पदावर नियुकी केल्याने त्यांनी जिल्हाध्यक्ष सुभाष भाऊ धोटे माजी विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार खासदार प्रतिभा ताई धानोरकर चंद्रपूर जिल्हा प्रभारी आमदार अभिजित वंजारी शिक्षक आमदार सुधाकर अडवले रजनी ताई हजारे आणि माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांचे आभार मानले.

देवेंद्र आर्य यांच्या नियुक्ती वर माजी शहर अध्यक्ष अब्दुल करीम तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे माजी नगराध्यक्ष छाया ताई मडावी तालुका महिला अध्यक्ष अफसाना सय्यद शहर महिला अध्यक्ष मेघा भाले चंद्रपूर जिल्हा परिवहन अध्यक्ष नरेश मुंदडा बल्लारपूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष नरेश आनंद भास्कर माकोडे डॉ  सुनील कुलदीवार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ. अनिल वाढई चेतन गेडाम जयकिरण बाजगोटी इस्माईल ढाक वाला प्रणेश अमराज चंदा बुंदेल मीना बहु रिया रवी मातंगी कासिम भाई शरद alone सुरेश बोपणवार यांनी अभिनंदन केले .

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये