
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- ब्रह्मपुरी शहरांमध्ये विकासाच्या नावाखाली ब्रह्मपुरी ला भकास करणे चालू आहे. एकीकडे मल नित्सारण योजनेतून प्रत्येक गल्लीबोळामध्ये गटर लाईनच्या नावाखाली छोटे पाईप टाकून पूर्ण सिमेंटचे रस्ते डांबर रस्ते फोडून त्यामध्ये पाईप टाकून ते बुजवण्यात आले परंतु त्या ठिकाणी खोदलेल्या कामावर कोणतीच अशी उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळे ब्रह्मपुरी च्या प्रत्येक गल्ली बोळीमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले आहे . नागरिकांना चालणे मुश्किल झाले आहे.
ब्रह्मपुरी येथील मेन रोड सुद्धा डांबरीकरणाचा असून त्यावर पूर्ण लाल माती व पूर्ण चिकल पसरलेला आहे सोबत इंदिरा गांधी चौक ते टिळक नगर पर्यंत रोडचे रुंदीकरण सुरू असल्याने व नाल्याचे खोदकाम सुरू असल्याने ती सुद्धा माती रोडवर येत असून मेन रोड सुद्धा चिखलमय झालेला आहे याकडे नगरपालिका प्रशासन लक्ष देणार का असे सर्व सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे. यातच भाजप युवा मोर्चा ने नगर परिषद ला निवेदन देऊन सर्वसामान्य जनतेच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा चिखल फेको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.