देऊळगाव राजा शहर काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहर काँग्रेस पक्षाची बैठक रविवारी पार पडली. अध्यक्ष पदी जेष्ठ नेते अनिल सावजी होते, नवनियुक्त तालुका अध्यक्ष रामदास डोईफोडे व शहर अध्यक्ष अतिश कासारे यांचे स्वागत करण्यात आले, शहर काँग्रेस पक्षाची नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यासाठी प्रत्येक प्रभाग मधून कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असे ठरले, त्यानुसार कार्यकारिणी गठित करण्यात येणार आहे.
काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे असे आवाहन अनिल सावजी यांनी केले. शहरातील प्रमुख समस्या दूर करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले, यावेळी माजी नगरसेवक हनीफ शहा, डॉ अशोक काबरा, प्रा अशोक डोईफोडे, म नसीर हाजी रज्जाक, मतीन चाऊस, इरफान सय्यद, विनू लंगोटे, संतोष वाघ, आकाश कासारे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.