Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

वर्धा जिल्हा कारागृह येथे डिसेंबर “मानवी हक्क दिन” दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. जिल्हाधिकारी, वर्धा यांचेकडील आदेशानुसार आज दिनांक १०/१२/२०२३ रोजी वर्धा जिल्हा कारागृह वर्ग-१ येथे बंदीस्त असलेल्या बंदयांकरीता १० डिसेंबर “मानवी हक्क दिन” हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थीत कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्री. विवेक देशमुख, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा यांनी कारागृहात बंदीस्त असलेल्या बंदयांना मानवी हक्क संरक्षण कायदयाअंतर्गत संपुर्ण माहीती दिली. त्याचप्रमाणे चैतन्य सेवा भावी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अॅड. अनिता ठाकरे यांनी सुध्दा बंदयांना मानवी हक्काबाबत योग्य मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुरुंगाधिकारी श्रेणी-२, श्री. सुहास नागमोते यांनी केले.

सदर कार्यक्रमाकरीता मा. श्री. विवेक देशमुख, सदस्य सविच, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा. श्रीमती अॅड. भगत, श्रीमती अॅड. गडपाल, श्रीमती अॅड. अनिता ठाकरे, अध्यक्ष, चैत्यन्य सेवाभावी संस्था, वर्धा, श्री. नितीन क्षिरसागर, प्रभारी कारागृह अधीक्षक, कारागृह वैद्यकिय अधिकारी श्रीमती रश्मी गोडे, श्री. सुहास नागमोते, तुरूंगाधिकारी, श्री. जितेंन्द्र भावसार, तुरुंगाधिकारी, तसेच कारागृह कर्मचारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धाचे कर्मचारी उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये