ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेत शिवारतील अॅल्युमिनियम विद्युत तारांची चोरी

गुन्ह्याची कबुली., संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

फिर्यादी श्री रमेश लक्ष्मय्या अल्लम वय ३६ वर्ष धंदा नौकरी रा. गुरूनानक कॉलेज मागे बामाणी, ता. बल्लारपुर जि. चंद्रपुर मुळ रा. ओदेला, पेद्दापल्ली, राज्य तेलंगणा यांनी मौजा येडसी ता. बल्लारपूर येथील शेत शिवारतील अॅल्युमिनियम विद्युत तार अंदाजे १,२७,८००/- रू वा माल अज्ञात आरोपीतांनी चोरून नेला आहे असे दि. ०४/०२/२०२५ रोजी पोलीस ठाणे बल्लारपूर येथे दिलेल्या फिर्याद वरून अप.क. १६१/२०२५ कलम ३०३ (२) भा.न्या.सं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी व चोरीस गेले मालाचा मुखबीरांचे मदतीने शोध घेतला असता सदरचा गुन्हा आरोपी नामे १. प्रविण उर्फ मारी दिलीप आमटे, वय २२ वर्ष, रा. सुभाष वार्ड, जोकु नाला, बल्लारपुर २. शाकीर अबिदखान पठाण वय २५ वर्ष, रा. बालाजी वार्ड, वाटर सप्लायचे बाजुला, बल्लारपुर व ३. कुणाल गणेश गौर वय १८ वर्ष, रा. श्रीराम वार्ड, स्मशान घाटाचे जवळ, बल्लारपूर यांनी केल्याचे समजले. वर नमुद आरोपीतांना विश्वासात घेवुन त्यांचकडे तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केला व त्यांनी सदर गुन्हयात चोरलेले अॅल्युमिनियम विद्युत तार किं.अं. ८०,०००/- रू चा मुद्देमाल आरोपीतांकडुन जप्त करण्यात आला आहे.

सदर ची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक  मुम्मका सुदर्शन सा. मा. अपर पो. अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, श्री. सुधाकर यादव सा. उपविभागिय पो अधिकारी, राजूरा यांचे मार्गदर्शनात पो. निरिक्षक बिपीन इंगळे, सपोनि मदन दिवटे, सफौ. आनंद परचाके, पोहवा. सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, सुनिल कामतकर, पो. अंमलदार शरदचंद्र कारूष, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, भास्कर चिचवलकर, सचिन राठोड, विकास जुमनाके सचिन अलेवार, म.पो. अंमलदार अनिता नायडू, इत्यादी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने गुन्हा उघडकीस आणला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये