ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शाळेचा पहिला दिवस : मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

आनंदी वातावरणात विद्यार्थी घडवा - पुलकित सिंह

चांदा ब्लास्ट

जिल्ह्यातील जिल्हा परिषद च्या सर्व शाळा सुरू झाल्या असून, सर्व शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी सावली तालुक्यातील चेकपिरंजी या गावातील जिल्हा परिषद शाळेत जाऊन, विद्यार्थ्यांच्या शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांवर पुष्पाचा वर्षाव करून स्वागत केले. विद्यार्थ्यांना आनंदी वातावरणात शिक्षण द्या. अशा सूचनाही यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केल्या.

शाळेत दाखल झालेल्या सर्व मुलांना गावातून बैलबंडीमध्ये बसून, शाळेत आणण्यात आले. शाळेत सर्व मुलांचे स्वागत करण्यात आले. याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या शुभ हस्ते उपस्थित सर्व पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके,गणवेष तथा बूट इत्यादी साहित्याचे वितरण करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी शाळा,शाळेचा परिसर,शौचालय स्वच्छतागृह,स्वयंपाक गृह या परिसराची पाहणी केली. शालेय परिसरात वृक्षारोपण केले.

यासोबतच विद्यार्थ्यांसोबत शालेय जीवनातील आठवणी म्हणून चर्चा केली . विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्यासोबत खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला. सर्व विद्यार्थ्यांसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सेल्फी फोटो घेतला. विद्यार्थ्यांना आनंदी वातावरणात शिक्षण द्या .शाळेत आनंदी वातावरण निर्माण करा. चंद्रपूर जिल्ह्यात चांगले विद्यार्थी घडवा. शाळा शाळेचा परिसर नेहमीच स्वच्छ ठेवा. असेही निर्देश यावेळी संबंधित यंत्रणेला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी दिले.

यावेळी सावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय नैताम, गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंडे, केंद्रप्रमुख किशोर येनगंटीवार, मुख्याध्यापक सुधाकर चरडुके, सरपंच उषाताई गेडाम यावेळी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये