जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
पंचायत समिती कोरपना अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे नुकताच शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळी वर्ग पहिली मध्ये दाखल पात्र विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीने बैलबंडीतून मिरवणूक काढून शाळेत दाखल करण्यात आले. सदर कार्यक्रमाला कोरपणा तहसीलच्या तहसीलदार पल्लवी आखरे यादेखील उपस्थित होत्या. त्यांनी सर्व नवागतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकाचे वितरण सुद्धा केले यावेळी बोलताना पल्लवी आखरे या म्हणाल्या की जिल्हा परिषदेचे शिक्षण हेच खऱ्या अर्थाने आदर्श विद्यार्थी घडवू शकते आपण आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल केले.
त्याबद्दल पालकांचे देखील त्यांनी कौतुक केले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांसोबत शालेय पोषण आहार चा देखील लाभ घेतला विद्यार्थ्यांसमवेत भोजन केले. तसेच संपूर्ण शाळा परिसर पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मुकेश निमकर सदस्य गुलाब निमकर विठ्ठल आंबेकर मारुती चौधरी लटरी धोटे घनश्याम भोंगळे व शाळेचे मुख्याध्यापक सखाराम परचाके पुष्पा इरपाते विनायक मडावी अनिल राठोड नितीन जुलमे काकासाहेब नागरे सचिन सोनपितरे उपस्थित होते.
यावेळी वर्ग पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता संचालन श्री काकासाहेब नागरे यांनी केले तर आभार श्री नितीन जुल्मे यांनी मानले.