ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेतीची माहिती दिल्याच्या संशयावरून 34 वर्षीय इसमास मारहाण

चंदनखेडा येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     रेती बद्दल शासकीय अधिकाऱ्यास माहिती दिल्याच्या संशयावरून एका 34 वर्षीय युवकास अमानुषपणे मारहाण केल्याची घटना तालुक्यातील चंदनखेडा येथे दिनांक 22 रोज रविवारला सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. अनिल गायकवाड वय 34 वर्षे, राहणार चंदनखेडा असे या मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आली आहे.

अनिल गायकवाड हा गावातील एका पानठेल्या जवळ बसून असता गावातील मारुती गायकवाड, गजू रणदिवे व रामू गायकवाड यांनी लाथा बुक्क्यांनी व लोखंडी राडच्या सहाय्याने अनिल गायकवाड याला अमानुषपणे मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याला सुट्टी देण्यात आली. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये