निधन वार्ता – सुमनबाई मल्लावत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथिल राजस्थानी समाजाचे ज्येष्ठ व प्रसिद्ध व्यापारी जुगलकिशोर मल्लावत यांच्या धर्मपत्नी सौ. सुमनबाई यांचे दिनांक 14 जून रोजी रात्री अल्पशा आजाराने वयाच्या 80 व्या वर्षी दुखद निधन झाले.
शहरातील गणराज डीस्टीब्युटर चे मालक माजी नगरसेवक तथा या परिसरात आंतर राष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट खेळास जिवंत ठेवण्याचे काम करणारे खेळाडू व प्रसिद्ध सिंगर दीपक मल्लावत यांच्या त्या मातोश्री तर प्रसिध्द सनदी लेखापाल ca राज दिपक मल्लावत यांच्या त्या आजी होत्या.
त्यांच्या कुटुंबात त्यांच्या पश्चात पती,2 मुले,2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी सर्वच स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.