ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुक्ताबाईंच्या पालखीचे देऊळगाव राज्यात उत्स्फूर्त स्वागत…

शहरात भक्तिमय वातावरण; वारकऱ्यांना चहा फराळ वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजात संत मुक्ताबाईच्या पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. टाळ मृदंगाच्या गजरात गावात भक्तीपूर्ण वातावरण झाले होते.

 वरून राजाने केले स्वागत…!

देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी : आषाढी एकादशी

निमित्त पंढरपूर येथील विठुरायांच्या भेटीसाठी निघालेल्या संत आदिशक्ती मुक्तामाईंच्या पालखीचे देऊळगाव राजा येथे भव्य स्वागत करण्यात आले आज 14 जूनला सायंकाळ दरम्यान उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले पालखीचे आगमन होतात वरून राजाने सुद्धा हजेरी लावली शहरातील कमिटी चौक तसेच इतर भागात स्वागत करण्यात आले. त्यापूर्वी तालुक्यातील देऊळगावमही शहारात सुद्धा टाळ-मृदंगाच्या निनादात पालखीचे आगमन झाले. तालुक्यातील देऊळगाव मही येथून देऊळगाव राजा येथे आगमन भाविकांनी भक्ती भावाने भर पावसात शहरातील भाविकांच्या वतीने पालखीचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मुक्तामाईंची पालखी पंढरपूर जाण्यासाठी मार्गस्थ झाली आहे. ही पालखी राज्यातून सर्वात आधी पंढरपूर येथे विठुरायाची भेट घेण्यासाठी जाते

देऊळगावमही येथून निघालेल्या पालखीचे 14जून रोजी देऊळगाव राजा शहरागत आगमण झाले यावेळी शहरात भाविकांच्या वतीने पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले

पालखीचे टाळ मृदंगाच्या निनादात मुक्ताबाईच्या जय घोषात आगमण झाले पालखीचे आगमन होताच ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करून वारकऱ्यांना चहा पाणी व फराळ वाटप करण्यात आले.

जाण्यासाठी निघते या आषाढी एकादशीची 223 वर्षांची परंपरा लाभली आहे.

३५ तालुक्यांसह अनेक शहरांतून व खेड्या गावातून पालखी मार्गक्रमण करणार आहे. पालखी शहरात टाळ मृदंगाच्या निनादात मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाईच्या जय घोषात दाखल झाली होती. ही पालखी देऊळगावराजा येथे आज श्री संत धोंडीराम महाराज मठात विश्रांती घेणार आहे 15 जूनच्या सूर्योदय समयी मार्गस्थ होत. मराठवाड्यातील जालना, अंबड, बीड,आष्टी मार्गे पंढरपूरला मार्गस्थ होणार आहे. ठिकठिकाणाहून वारकरी व भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे. पालखीचे आगमन होताच विठ्ठल मंदिर भजनी मंडळ व स्वयंसेवी संघटनांनी पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले.

ढोल पथकाच्या समवेत गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी स्वागतासाठी महिलांनी पालखीचे औक्षण केले यावेळी आनंदमय वातावरण होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये