शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत उपचारदरम्यान एकाचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथे शेतीच्या वादातून मारहाण झाल्याची घटना बुधवार दिनांक ११ रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान या मारहाणीत गंभीररित्या जखमी झालेल्या शेतकऱ्याचा चंद्रपूर येथे रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवार दिनांक १२ रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कोरपना पोलिसांनी अटक केली आहे.
पुंडलिक कारेकर रा.कोरपना असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या मारहाणीत मृतकाचा मुलगा जगदीश व किशोर याला ही गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीची याप्रकरणी बुधवारी च कोरपना पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. भारतीय न्याय सहिता २०२३ चे कलम ३५२ , ३५१(२),११८(२),१९१(२),१९०,१८९(२)१८९(१) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र पुंडलिक कारेकर यांच्या मृत्यूनंतर सर्व दोषीवर कलम १०३ तर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बबन गारघाटे, अरुण नवले, विजय मसे, अरविंद मसे, राजेश नवले या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक १३ रोजी कोरपना न्यायालयाने १४ दिवसाची कोठडी सुनावून चंद्रपूर तुरुंगात रवानगी केली आहे.
तसेच मृतकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ही करण्यात आले आहे. पुढील तपास कोरपना चे ठाणेदार दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलिस करीत आहे.