ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वडगाव येथे वीज पडून बैलजोडी ठार

शेतकऱ्यावर ओढवले आर्थिक संकट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 – कोरपना तालुक्यातील वडगाव येथील शेतकरी मारोती नागोबा देवाळकर त्यांच्या शेतात वीज कोसळून त्यांची बैलजोडी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

माहितीनुसार, देवाळकर हे आपल्या शेतात बियाणे लागवडीचे काम करत होते. कामाच्या दरम्यान त्यांनी बैलजोडीला झाडाजवळ बांधून ठेवले होते. याच दरम्यान, आकाशात अचानक काळे ढग दाटून आले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. क्षणात वीज कोसळून ती थेट बैलजोडीवर आदळली.

या दुर्घटनेत दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच ही दुर्दैवी घटना घडल्याने देवाळकर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. शासनाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये