ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील मुक्त विद्यापीठ व दूरस्थ शिक्षणाच्या अभ्यासकेंद्रांना आळा घाला

गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स ने सुचविल्या उपाययोजना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

– गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, इंदिरा गांधी हिंदी विश्वविद्यालय वर्धा अशा अनेक विद्यापीठाचे अभ्यास केंद्रे सुरू असल्यामुळे गोंडवाना विद्यापीठ सलग्नित महाविद्यालयाच्या पदवी शिक्षण प्रवेशावर फार मोठा परिणाम झाला असून गोंडवाना विद्यापीठाची एकूण संख्या मागील वर्षाच्या तुलनेत 20000 ने कमी झालेली आहे. त्यामुळे महाविद्यातील शैक्षणिक तुकड्या बंद तथा शिक्षक अतिरिक्त होऊन विद्यार्थी अभावी भविष्यात अनेक महाविद्यालय बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

   सदर गंभीर बाब लक्षात घेऊन गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रात जी मुक्त विद्यापीठ व दूरस्थ शिक्षणाची अभ्यास केंद्रे सुरू आहे यावर नियंत्रण घालण्याच्या दृष्टीने गोंडवाना यंग टीचर संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ. विवेक गोर्लावार आणि व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य लेमराज लडके यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांना उपाययोजना सादर केल्या असून त्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

          महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व इतर दूरस्थ शिक्षणामुळे विद्यापीठ व सलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर फार गंभीर परिणाम होत आहे. याविषयीची माहिती तातडीने सदर मुक्त विद्यापीठांना अवगत करणे.

     महाराष्ट्रातील मुक्त विद्यापीठांच्या विद्यापीठ ॲक्ट मध्ये सदर शिक्षण विशेषता शिक्षणापासून वंचित झालेल्या आणि नोकरीदार पुरुष व महिला वर्गासाठी हे शिक्षण देण्यासंबंधीची तरतूद आहे मात्र या तरतुदीची सर्रास पायमल्ली होत असून मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रानं मार्फत सर्रास रेगुलर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो यावर कुठेतरी आळा घालण्यासाठी मुक्त विद्यापीठांना सूचना करावी.

      मुक्त विद्यापीठे आणि दूरस्थ शिक्षण यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये जे अभ्यास केंद्रे सुरू केली आहे, त्यामध्ये सर्रास नियमित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे असे नियमित प्रवेश न देण्याबाबत महाविद्यालयांकडून प्रतिज्ञापत्र घ्यावे.

      गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील ज्या महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू आहेत अशा महाविद्यालयांना सदर केंद्र बंद करण्यासंबंधी गोंडवाना विद्यापीठाने सूचना द्यावी आणि बंद न केल्यास विद्यापीठाने त्यांचे संलगणीकरण रद्द करावे.गोंडवांना विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयामध्ये मुक्त विद्यापीठ किंवा इतर विद्यापीठाचे अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठाची पूर्वपरवानगी घ्यावी यासंबंधी गोंडवाना विद्यापीठाने कडक धोरणात्मक निर्णय घ्यावा.

     सदर गंभीर विषय संबंधित गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सिनेट आणि विद्यापरिषदेत या संबंधित विषयावर ठराव घेऊन सदर अहवाल राज्यपालाकडे पाठवावा आणि यावर उचित कारवाई करण्यासंबंधी विनंती करावी.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये