मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मोफत रुग्ण तुकडी रवाना होणार
सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समितीचा उपक्रम

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर) : येथील मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र आणि मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जून रोजी सकाळी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची तुकडी रवाना केली जाणार आहे. विशेष म्हणजे सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.
ही मोफत वैद्यकीय सेवा मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती, महाराष्ट्र यांच्यातर्फे दिली जात असून, ज्या रुग्णांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायची आहे त्यांनी त्वरित घुग्घुस येथील सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी केले आहे.
हा उपक्रम डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. इच्छुकांनी वेळेत नोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही समितीकडून करण्यात आले आहे.