ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती तालुक्याला वादळाचा फटका : मोठे नुकसान

पंचनाम्यासाठी महसूल विभागाचे पथक रवाना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           रात्रोला आलेल्या जोरदार वादळाचा फटका भद्रावती तालुक्यातील परिसराला बसला असुन या वादळामुळे तालुक्यातील अनेक गावात मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची तात्काळ दखल घेत तहसीलदार राजेश भांडारकर यांनी महसूल विभागाचे पथक परिसरात सर्वत्र रवाना केले असून नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामाचे आदेश देण्यात आले आहे.

रात्रीच्या वेळेस तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाला सुरुवात झाली. या वादळाचा मोठा फटका किलोनी, जेना, केसुर्ली, थोराना, कोकेवाडा, नागलोन, विसलोन आदी गाव परिसराला बसला. या वादळाने परिसरातील विद्युत तारा व वृक्ष तुटून पडले. गुरांच्या गोठ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गावकऱ्यांच्या घरावरील छते उडाली आहे. या वादळाचा फटका उन्हाळी पिकांनाही बसला आहे. गावकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र या वादळामुळे सुदैवाने कोणतिही अनुचित घटना घडली नाही.

या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तलाठ्यांचे पथक परिसरात सर्वत्र पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार राजेश भांडारकर यांनी दिली आहे. पथकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नुकसानीचा नेमका अंदाज येईल.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये