ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माणिकगढ सिमेंट वर्क्स च्या वतीने लिंगनडोह गावात आरोग्य शिबीर संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेन्ट लिमिटेड च्या वतीने दिनांक 4 जुन रोजी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. माणिकगढ कंपनी समाजातील लोकांसाठी आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवत असते .आरोग्य हीच संपत्ती असते.

हे आरोग्य शिबीर अल्ट्राटेक कंपनी व नोबल शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. शिबीर मध्ये आरोग्य तपासनी आणि रक्त तपासनी करण्यात आली.रक्त तपासनी मध्ये बी.पी,शुगर,कावीळ, ऐच.आय.व्ही, तपासण्यात आली.

नोबल शिक्षण संस्थाचे गोपाल पोर्लावार , प्रकल्प समन्वयक वैभव टेंगसे _ वैद्यकीय अधिकारी  मधुकर मंत्रा,  समुपदेशक

सन्नी वारखडे, ओ.आर,डब्लु मयूर जनावडे, ओ.आर,डब्लु यांचे सहकार्यातून आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने हे आरोग्य शिबीर यशस्वी पार पडले एकुन 60 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. गावकर्‍यांनी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड ,माणिकगढ सिमेंट वर्क्स सी.एस आर टीम चे धन्यवाद मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये