ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांचे प्रलंबित पीक विम्याचे पैसे तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करा

आमदार मनोज कायंदे यांची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

लोकप्रिय युवा आमदार मनोज कायंदे यांनी राज्याचे कृषीमंत्री मा. माणिकराव कोकाटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुंबई येथे भेट घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी काही महत्वाच्या मागण्या मांडल्या.

शेतकऱ्यांचे प्रलंबित पिक विम्याचे पैसे तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्याची विनंती केली.

येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे यांची कोणतीही टंचाई भासू नये यासाठी आधीच योग्य नियोजन करून, संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ आदेश द्यावेत,

शेतकऱ्यांच्या हिताची असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ( पोखरा 2.0 ) योजना तात्काळ प्रभावीपणे राबवण्याची मागणी केली.

कृषी मंत्री महोदयांनीही सर्व प्रश्न मार्गी लावण्या बाबत आश्वासीत केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये