ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तुकूम येथे भीषण अपघात, आमदार किशोर जोरगेवार यांची घटनास्थळी पाहणी

जखमींची रुग्णालयात जाऊन भेट., शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत

चांदा ब्लास्ट

तुकुम येथील अपघास्थळाची आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट दिली असून येथील वाहतुक अरथडे दुर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. सदर रस्या कडेला वाहणे उभी राहु देउ नका अशा सुचनाही त्यांन केल्या असुन अपघात जखमी असलेल्या काजल आत्रात हिचीही रुग्णालयात जात भेट घेत शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत केली आहे.

हायवा चालकाला फिट आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहनाने रस्त्याकडेला असलेल्या नागरिकांना चिरडले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून काही नागरिक जखमी झाले होते. सानिका कुमरे (वय २२ वर्षे, रा. लक्कडकोट) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना तुकूम येथे घडली असून, आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काजल आत्राम हिची आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास हायवा चालक तुकूम परिसरातून जात असताना, चालकाला फिटचा झटका आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनाने रस्त्यालगत उभ्या असलेल्या नागरिकांना आणि ऑटोला चिरडले. या घटनेत सानिकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर नागरिक जखमी झाले आहेत. यात नंदा उंबरकर (वय ५५, रा. मेजर गेट,) या किरकोड जखमी झाल्या आहेत. तसेच काजल आश्राम (रा. उपरवाही, ता. राजुरा) हिला जास्त इजा झाल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांची उपस्थिती होती. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या काजल मेश्राम हिची भेट घेतली आणि सुरु असलेल्या उपचाराबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. मृतक आणि जखमी या दोघीही मैत्रीनी असुन त्या पोलिस भरतीच्या तयारी करिता चंद्रपूरात राहत हांत्या. त्या एका खाजगी अभ्यासिकेत अभ्यास करुन घरी जात असतांना सदर घटना घडली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये