ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नियमबाह्य रेती उपसा पाप गंगेत वाहून जाणार?

तामसी घाटाची चौकशी कार्यवाही कधी होणार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 महामार्ग क्रमांक 353 या रस्ते विकास कामासाठी म्हणून प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चंद्रपूर मार्फत जी आर आय एल इन्फ्रा खिर्डी यांनापैनगंगा नदीच्या तामसी घाटावरून गट क्रमांक 15 16 19 22 मधील एक हेक्टर 75 आर क्षेत्रातून 6184 ब्रास रेती उपसा करण्याची एक ते 23 अटीवर मंजुरी जिल्हाधिकारी खणीकर्म विभाग यांनी दिलीजानेवारी 2025 पासून 20 मे पर्यंत सूर्योदयानंतर सूर्य अस्तपर्यंत ट्रॅक्टर व मनुष्यबळ वापर करून रेतीचा व (वाळु )उपसा 140 दिवस या कालावधीत करण्यात आला.

तर याच घाटावरून नियमबाह्य रेती रात्रोला उपसा उत्खनन होत असल्याच्या अनेक तक्रारी गडचांदूर नांदा भोयगाव परिसरातून झाल्या मात्र तस्कर अथवा कंपनीच्या एकाही वाहनावर कारवाई झाली नाही हे विशेष वाळू वाहतूक मंजुरी आदेशातील अटी शर्ती भंग झाल्या असून मंजुरी आदेशातील परिणामा पेक्षाही अधिक पटीत वाढू उत्खनन व वाहतूक झालेली आहे मात्र अचूक अहवाल बेंच मार्ग खोदकाम वाहतूक परवाना या सर्व बाबी संशयास्पद असतानाकॅमेरा फुटेज जीपीएस सीसीटीव्ही छायाचित्रण ठराविक वेळेत उपयुक्त माहिती तहसील कार्यालयाला सादर केलीच नाही निश्चित क्षेत्र बाहेर उत्खनन झाले असून अटी शर्तीतील एक मीटर पेक्षा अधिक प्रमाणात खोदकाम करता येणार नाही.

असे नमूद असताना सुद्धा तीन मीटर खोलीपर्यंत खोदकाम झाले कसे व त्या ठिकाणी निरीक्षण तपासणी कधीच झाली नाही का याबाबतची तक्रारमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे झालेले आहेत दि. सात पाच दोन हजार पंचवीस ला ई-मेल द्वारे तक्रार सुद्धा करण्यात आली व यामध्ये तामसी घाटातील चौकशी मोजमाप घेण्यात यावा अशी मागणी केली मात्र पाऊस काळात होणार असताना सुद्धा केल्या तब्बल वीस दिवसापासून याबाबतची कोणतीही चौकशी किंवा मोजमाप घेण्यात आलेले नाही मात्र पावसाच्या सरी रिमझिम सुरुवात होतात तहसीलदार कोरपणा यांनी दिनांक 29/5/2025 ला मंडळ अधिकारी तलाठी भारुसा यांना मोजमाप करून अहवाल मागला असला तरी अचूक माहिती ते देतील ही खात्री मुळीच नाही.

कारण रेती तस्करी मध्ये कुंपणच शेत खात असल्याच्या घटना घडल्याने मार्चपासून मेपर्यंत शेकडो ट्रॅक्टर द्वारे परसोळा कोठोडा पिपरी झोटिंग या ठिकाणावरून उत्खनन झाल्याच्या तक्रारी झाल्या मात्र या कालावधीत महसूल पथकाने फक्त दहा ट्रॅक्टर जमा जप्त करणे म्हणजे वराती मागे घोडे धावण्याचा हा प्रकार जिल्हा खलीकर्म विभागाने बेंच मार्क जीपीएस मोजमाप करून पावसाचे पुराचे पाणी येण्यापूर्वी चौकशी व कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभी दली यांनी केली आहे.

अन्यथा चोरी चोरी चुपके चुपके झालेले सर्व पाप पुराच्या पाण्यात अवैध उत्खननाचे गंगेत वाहून जाणार अतिरिक्त उत्खननाचा स्वामित्व धन पाण्यात जाणार व संबंधित विभागाचे निश्चिंत बेधडक आनंद साजरा करणार हे मात्र निश्चित आता कारवाई होणार का याबाबत तर्कवितर्क जनतेमध्ये लावल्या जात आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये