परिवर्तन पॅनलचे ११ संचालक विजयी
चोरा आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील चोरा येथील आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीच्या पार पडलेल्या निवडणुकीत १३ संचालकांपैकी परिवर्तन पॅनलच्या ११ संचालकांनी विजय संपादन केला.
माजी जिल्हा परिषद सदस्य भगतसिंग मालुसरे आणि माजी पंचायत समिती सभापती परशुराम जांभुळे यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनलने ही निवडणूक लढवली. या विविध कार्यकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात ९ गावांचा समावेश आहे.
सन २०२५ ते २०३० या पाच वर्षाच्या कालावधीसाठी ही निवडणूक पार पडली. यात परिवर्तन पॅनलचे अनुसूचित जाती- जमाती गटाचे मधुकर जांभूळे, विमुक्त भटक्या जाती जमाती गटाचे नामदेव बावणे, इतर मागासवर्गीय गटाचे विनोद खाडे, सर्वसाधारण आदिवासी कर्जदार गटाचे देवेंद्र मालुसरे, भगतसिंग मालुसरे आदिवासी कर्जदार गटाचे परशुराम जांभुळे,राजू सावसाकडे ,बंडू ताटघरे, विनोद नन्नावरे, बी.टी. जांभुळे, परशुराम जांभुळे, आदिवासी गटाचे भाऊराव शेंडे, आदिवासी महिला गटाच्या इंदू नन्नावरे या विजयी झाल्यात.