आयुष्यातील प्रत्येक अनुभव सर्वांसाठी सारखा नसतो – पोलिस उपनिरीक्षक सचिन मुसळे
विश्वशांती विद्यालयात यशस्वितांची यशोगाथा कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार
मानवी आयुष्य अनेक अनुभव, संघर्ष आणि शिकवणीने भरलेले असते. व्यक्तिगत आयुष्यात पावलोपावली अनेक अनुभव येत असतात त्यातून मार्ग काढत जगणे हेच सत्य आहे आणि आयुष्य म्हणजे एक स्पर्धा आहे ती समजायला लागल्यापासून गांभीर्याने घेतले पाहिजे म्हणून आयुष्यातील प्रत्येक अनुभव सर्वांसाठी सारखा नसतो,असे मत सावली पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे यांनी विश्वशांती विद्यालयात आयोजित यशवंताची यशोगाथा या कार्यक्रमात मत व्यक्त केले.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे यशस्वितांची यशोगाथा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात प्रकट मुलाखतीसाठी पोलिस उपनिरीक्षक सचिन मुसळे यांना आमंत्रित करण्यात आले.मुलाखतीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याच्या अनेक मार्गाचा त्यातून उलगडा करण्यात आला.तसेच पोलिस विभागातील सुशासन आणि स्पर्धा परीक्षा या विषयी आपले स्पष्ट मत व्यक्त केले.
त्यात मुलाखतकार म्हणून प्रा. राजू केदार यांनी भूमिका पार पाडली.मुलाखतीच्या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक मधुकर जाधव,किशोर संगिडवार यांची प्रमुख उपस्थिती होती.सदर कार्यक्रमाचे आयोजन डॉ.शेखर प्यारमवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
आयोजित यशस्वीतांची यशोगाथा या मुलाखत कार्यक्रमात विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा आणि अभ्यासाबद्दल असलेल्या समस्याच्या प्रश्नांची विचारणा करत मुलाखत कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.