ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे विद्यार्थ्याना सक्षम करण्यासाठी श्री विद्या आराधना सायन्स अकॅडमी सज्ज 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

बालाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देऊळगाव राजा येथे विद्यार्थांना सक्षम करण्यासाठी श्री विद्या आराधना सायन्स अकॅडमी, सातेफळ रोड वर उघडली आहे. सहावी ते दहावी च्या सी बी एस ई, फाउंडेशन, एनईईटी, जे ई ई, एम एच टी – सी ई टी बोर्ड साठी, व्यापक आणि वैयक्तिकृत कोचिंग देते, या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्याना त्यांच्या शैक्षणिक कार्यात उत्कृष्ठ कामगिरी करण्यासाठीं आणि त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यासाठीं आवश्यक असलेली संसाधने आणि मार्गदर्शन प्रदान करणे आहे अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक प्रा आर जी मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संस्थापक अध्यक्ष श्रीमती अनुराधा शिंदे यांनी सांगितले की आमच्या अकॅडमी साठी प्रत्येक विद्यार्थी हा अद्वितीय आहे, आणि म्हणूनच यांना विविध प्रकारचे शिक्षण पर्याय देते, या केंद्रात अनुभवी आणि समर्पित प्राध्यापक आहेत, जे अध्यापनाची आवड असलेले आणि विद्यार्थ्याना यशस्वी होण्यास मदत करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगीतले, विद्यार्थ्याना उच्च दर्जाचे शिक्षण देणे, त्यांच्या शैक्षणिक प्रवासात उत्कृष्ठ कामगिरी करण्यासाठीं आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्ये आणि आत्मविश्वास देऊन सक्षम करणे हे अकॅडमी चे ध्येय आहे असे सांगितले.

या अकॅडमी मध्ये शेतकरी,पत्रकार, माजी सैनिक, च्या पाल्यांना तसेच मुलींना फी मध्ये सवलत दिली जाईल अशी माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेत प्रा पी टी मोहिते, प्रा चतुरसिंग अरोरा,प्रा भरत कुमार, रमेश साळवे उपस्थित होते. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच प्रवेश घेण्यासाठी पालकांनी 7219851255 वर संपर्क साधावा असे सांगितले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये