ताज्या घडामोडी

19 डिसेंबर रोजी राजुरा येथे भव्य शेतकरी मेळावा व सांस्कृतिक क्रीडा महोत्सव

स्व. प्रभाकरराव मामुलकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार, लोकनेते स्व. प्रभाकरराव मामुलकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी ठीक ११.०० वा. राजुरा येथे भव्य शेतकरी मेळावा, सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा इतर मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली चे माजी कुलगुरू डॉक्टर विजय आइंचवार यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधाकर कुंदोजवार, माजी आमदार ॲड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट बाबासाहेब वासाडे, ज्येष्ठ संचालक तथा माजी सभापती दत्तात्रय येगिनवार, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीधरराव गोडे, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. अरुण धोटे, जिल्हा परिषद माजी सभापती अरुण निमजे, राजीव चंदेल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, जिवती नगरपरिषदचे माजी अध्यक्ष गजानन जुमनाके , ज्येष्ठ काँग्रेस नेते गजाननराव गावंडे, आबिद अली, माजी सभापती आबाजी ढूमने यांची उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमात राजुरा विधानसभा क्षेत्रातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या विशेष उल्लेखनीय व्यक्तींचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या कार्यक्रमाला बहुसंख्य जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, सहसचिव दौलतराव भोंगळे, कोषाध्यक्ष साजिद हुसेन बियाबानी, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एम वरकड, प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय, कोरपना येथील डॉक्टर टी सी जोसेफ, उपप्राचार्य डॉक्टर आर आर खेरानी , प्रा. बी. यु बोर्डेवार यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये