पालकमंत्री यांचा उद्या चंद्रपूर जिल्हा दौरा

चांदा ब्लास्ट
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे १० मे रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
१० मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मुल येथे शोभाताई फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट, सकाळी १० वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव, सकाळी ११ ते १ नियोजन भवन येथे खरीप हंगामपुर्व आढावा बैठकीस उपस्थिती, दुपारी १ वाजता राखीव, दुपारी १.३० वाजता वन अकादमी येथे ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमाला उपस्थिती, दुपारी २.३० वाजता वन अकादमी येथे जलसंपदा / पाटबंधारे विभागाच्या आढावा बैठकीला उपस्थिती, दुपारी ३ वाजता स्व. कन्नमवार सभागृह, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे पुस्तक प्रकाशन सोहळा व कवी संमेलनास उपस्थिती, दुपारी ३.३० वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.