भिसीचे नावाखाली 20 लाख 44 हजारावर नागरीकांची फसवणूक.
आरोपीचे घरझडती मध्ये पिडीतांचे बनावट चेक, बनावट स्टॅप पेपर आणि सोन्याचे 1 लाख रु चे दागीने जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन वर्धा शहर क्रंमाक गुन्हा 727/25 कलम 406, 409, 467, 468, 471, 211, 120 (ब) भा.द.वि.नरेश तुकाराम कांबळे वय 48 वर्ष रा. वायगाव निपानी यांनी व इतर नागरीकांनी पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे फिर्याद दिली की, आरोपी 1. गौतम गोमाजी देशभ्रतार, 2. रक्षक गौतम देशभ्रतार 3. कांचन गौतम देशभ्रतार 4. अंकीता गौतम देशभ्रतार 5. निकीता गौतम देशभ्रतार यांनी जयभीत ब्रदर्स अॅन्ड सोस्टर बिझनेस फंड या नावाने भिसी सुरु करुन प्रत्येक महिन्याला भिसी मध्ये पैसे जमा करणारे पिडीतांकंडुन 5,000 रु प्रमाणे रक्कम गोळा करुन फिर्यादीकंडुन 84,060 रु व इतर पिडीतांची 19,60,825 रु अशा प्रकारे 20,44,885 रु फिर्यादी आणि पिडीतांचे कंडुन घेवून पिडीतांना रक्कम न देता आर्थिक फसवणुक केली.
सिक्युरुटी म्हणून भिसी सुरु करतांना पिडीतांचे कंडून घेतलेले कोरे चेक आणि कोरे स्टंप पेपर यावर आपले मजर्जीने चेक मध्ये रक्कमा टाकुन चेकचे बनावटीकरण केले व आपले मर्जीप्रमाणे कोरे स्टंप पेपरवर मसुदा तयार करुन त्याचे बनावटीकरण करुन त्या बनावट चेकचा आणि स्टॅप पेपरचा गैरवापर करुन काही पिडीत भिसीमध्ये जमा केलेले पैसे मागण्यासाठी गेले असता पैसे मागू नये म्हणून बनावट तयार केलेल्या चेक आणि स्टॅप पेपरचे आधारे काही पिडीत यांचे विरुध्द 138 निगोसीएबल ईस्ट्रुमेट अॅक्ट प्रमाणे खोटया केसेस करुन आर्थिक फसवणुक केल्याचे लेखी फिर्याद वरुन सदर गुन्हा नोंद करण्यात आला.
- आरोपीचे घरझडती मध्ये पिडीतांचे बनावट चेक, बनावट स्टॅप पेपर आणि सोन्याचे 1,00,000 रु चे दागीने जप्त.
पिडीतांचे तक्रार अर्जाची दखल मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांनी घेतली., अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे, पोलीस उपअधिक्षक आर्थिक गुन्हे पुंडलीक भटकर यांचे मार्गदशनाखाली आरोपी यांचे घराची पोलीस स्टेशन सेलू येथील पीएसआय सिनुकूमार बानोत, पो.हवा पंच टिके, चाफलेकर, सचिन पवार तसेच आर्थिक गुन्हे शाखा येथील पीएसआय शांताराम मुदमाळी, पो.हवा देवेद्र कंडू, मनोज झाडे, महिला पोशि रोशनी ठाकरे यांनी पंचासमक्ष झडती घेतली असता आरोपीचे घरी आणि कार्यालयात पिडीतांचे मोठ्या प्रमाणात कोरे सहीचे चेक (159), कोरे स्टंप पेपर (32), पिडीतांचे चेकवर बनावट रक्कमा नमुद केलेले चेक (7), पिडीतांचे नावे बनावट मसुदा तयार केलेले स्टंप पेपर (29), पिडीतांचे नावाचे नोंदी असलेल्या रजिस्टर आणि अपहारीत रक्कमेतुन खरेदी केलेले सोन्याचे दागीने किमती अंदाजे 1,00,000 रु चा माल जप्त करुन कार्यवाही करण्यात आली.