ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर त्या नरभक्षक वाघाला पकडण्यात ब्रह्मपुरी वन विभागाला यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- दिनांक 13.04.2025 रोजी सकाळी 10.00 वाजता श्री. विनायक विठोबा जांभुळे रा. चिचखेडा वय वर्षे 60 हे मोहाफुले गोळा करीत असतांना त्यांचेवर वाघाने हल्ला करुन ठार केलेले होते व त्या आधी पण एका व्यक्तीला ठार केले व दोन व्यक्तींना जखमी केले होते त्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष उदभवू नये याकरीता 1-3 वाघाला जेरबंद करणे आवश्यक असल्याने आज दिनांक 17.04.2025 रोजी उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र मेंडकी नियतक्षेत्र चिचखेडा मधील कक्ष क्रमांक 152 मध्ये पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी डॉट तयार करुन दिला त्यानंतर अजय सी. मराठे , पोलीस हवालदार निशानेबाज यांनी T-3 वाघाला अचूक निशाणा लावून दुपारी 12.15 वाजता डॉट मारुन वाघाला बेशुध्द करुन जेरबंद करण्यांत आले.

उक्त कार्यवाही मा. सहाय्यक वनसंरक्षक (प्रादे व वन्य) ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी महेश चोपडे, तथा निम्नस्वाक्षरीकर्ते, सचिन नरड वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर ब्रम्हपुरी यांचेसह उपक्षेत्र मेंडकी, नवेगांव येथील क्षेत्रीय वनकर्मचारी तसेच डॉ. रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकिय अधिकारी RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, अजय मराठे पोलीस हवालदार (शुटर), विकास ताजणे, योगेश लडके, प्रफुल वाटगूरे, गुनणक धोरे, दिपेश टेंभुर्णे, वसीम शेख, अमोल कोरपे, जय सहारे, अक्षय दांडेकर, अभिषेक चांदेकर, राकेश आहुजा (बॉयोलाजिस्ट) यांचे उपस्थितीत पार पडली.

जेरबंद करण्यांत आलेल्या 1-3 (नर) वाघाचे वय अंदाजे 15 वर्षे असून त्याला गोरेवाडा रेस्कु सेन्टर नागपूर येथे स्थलांतरीत करण्यांत येईल.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये