ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंदनखेडा येथे 75 हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त

भद्रावती पोलिसांची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चंदनखेडा येथे एका महिलेच्या घरी धाड टाकून घरात साठवलेला सुगंधीत व हुक्का तंबाखू असा 75 हजार 375 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई भद्रावती पोलिसांकडून दिनांक 25 रोज शुक्रवारला सकाळी साडेअकरा वाजता च्या दरम्यान तालुक्यातील चंदनखेडा येथे करण्यात आली. याप्रकरणी निर्मला शामराव चौके व ५४ वर्ष राहणार चंदनखेडा या महिलेवर गुन्हा नोंदवून सर्व माल जप्त करण्यात आला.सदर महिलेच्या घरी सुगंधित तंबाखू साठवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिच्या घरी तपासणी केली असता चुंगडी व खरड्यांच्या बॉक्समध्ये सुगंधित व हुक्का तंबाखू आढळून आला.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक लता वाढिवे यांच्या मार्गदर्शनात अनुप आष्टुनकर, विश्वनाथ चुदरी, निकेश ढेंगे, योगेश घाटोळे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये