ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महसूल विभागाचा अवैध रेती तस्करांच्या विरोधात एल्गार सुरू*

भद्रावती तालुक्यातील मानोरा येथे अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भद्रावती महसूल विभागाने तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात अवैध रेती तस्करी विरोधात मोहीम तीव्र केल्याने अवैध रेतीतस्करांचे धाबे चांगले दणाणले आहे. भद्रावती महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाद्वारे तालुक्यातील मानोरा शिंगरु येथे एका अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करीत ट्रॅक्टरला तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

सदर कारवाई भद्रावती महसूल विभागातर्फे दिनांक 26 जानेवारीला रात्रो १०.४५ वाजता तालुक्यातील मानोरा शिंगरू येथे करण्यात आली. सदर ट्रॅक्टर भारत नागपूरे यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले.सदर कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनात भद्रावती महसूल विभागाने केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये