ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद (AICTE) द्वारा सहाय्यक प्राध्यापक भरतीच्या निकषांमध्ये युजीसी प्रमाणे मागासवर्गीयांना ५% ची शिथीलता देण्यात यावी

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराजजी अहीर यांना निवेदन सादर

चांदा ब्लास्ट

अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद (AICTE) द्वारा सहाय्यक प्राध्यापक भरतीच्या निकषांमध्ये युजीसी प्रमाणे मागासवर्गीयांना ५% ची शिथीलता मिळण्यासंबधीची मागणी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराजजी अहीर यांचेकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नितीन कुकडे, प्रा. प्रविण फटाले, भाजपा शहर महामंत्री प्रशांत डाखरे, माजी जि.प. सदस्य अशोक हजारे यांनी एका निवेदनाद्वारे केलेली आहे.

सदर निवेदन देत असतांना या विषयाबाबत सविस्तर चर्चा मा. हंसराजजी अहिर यांचेसोबत करण्यात आली. सविस्तर असे की, अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद (AICTE) ही राष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान तथा व्यवस्थापन अभ्यासक्रमांकरिता भारतातील सर्वोच्च सवैधानिक संस्था आहे. तंत्रज्ञान शिक्षण संस्थांमध्ये तसेच विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक भरती संदर्भात अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषदेने (AICTE) घालून दिलेले मापदंड हे सर्वच संवर्गांना एकसमान आहेत. यामध्ये खुला, ओबीसी, एससी, एसटी या प्रवर्गाकरीता सहाय्यक प्राध्यापक भरतीकरिता कमीत कमी प्रथम श्रेणी (६० टक्के) एवढी अट आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून दिनदुबळ्या व शोषीत वर्गांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता तार्कीक दृष्ट्या या वर्गांना सुट मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार युजीसी ही समान स्तरावरील स्वायत्त संस्था, सहाय्यक प्राध्यापक भरतीच्या निकषांमध्ये मागासवर्गीयांना शैक्षणिक गुणांमध्ये ५ टक्के शिथीलता देते. युजीसी प्रमाणेच मागासवर्गीयांना समान संधी संवैधानिक मार्गाने मिळण्याच्या हेतूने ओबीसी, एससी, एसटी या संवर्गाना सहाय्यक प्राध्यापक भरतीमध्ये शैक्षणिक गुणांमध्ये ५ टक्क्यांची शिथीलता अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषदेतर्फे देण्यात यावी याकरिता निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनाच्या प्रतिलीपी मा. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदीजी मुर्मु, पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री मा. श्री अमितजी शहा, सामाजिक न्याय व सक्षमीकरण केंद्रीय मंत्री डॉ. विरेंद्रजी कुमार, सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री मा. श्री रामदासजी आठवले, अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रो. टी. जी. सिताराम यांना देण्यात आल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये