ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात करिअर गाईडन्स वर मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

येथील महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोज शनिवारला केमिकल सोसायटी, फिजिक्स सोसायटी व करिअर सेलच्य माध्यमातून संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमा मध्ये करियर गायडन्स वर मार्गदर्शन करण्यात आले.

या संयुक्त कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. विठ्ठलरावजी थिपे, (उपाध्यक्ष, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर), प्रा. राजकमल पाठक (SSIT /GWCET) नागपूर व प्रा. रोशन पांडे (SSIT /GWCET) नागपूर यांचे मार्गदर्शन लाभले. कोरपना तालुक्यातील एकमेव विज्ञान महाविद्यालय म्हणून महात्मा गांधी सायन्स महाविद्यालयाची ओळख असून विज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांनी करियर करावे, या साठी महाविद्यालयातील प्राध्यापक मेहनत घेत असतात. त्याचाच एक भाग म्हणून या सोसायसीची स्थापना महाविद्यालयात मागील वर्षी करण्यात आली होती. सोबतच विज्ञान क्षेत्र निवडलेल्या विद्यार्थ्यांना आपले करियर करण्यासाठी नेहमीच मार्गदर्शक बोलावून विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होत असतो.

या संयुक्त कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. पवन चटारे यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. संदीप घोडीले यांनी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रसायनशास्त्राचे मुख्य प्रा. रामकृष्ण पटले हे होते. याप्रसंगी महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हजार होते, सर्व पाहुण्यांचे आभार प्रा. चेतन वैद्य यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये