ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिपरी येथे महिलांनी दारू पकडली

भद्रावती पोलिसांतर्फे आरोपीवर गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       अवैध विक्रीसाठी दुचाकीच्या डिकीमध्ये व घरात साठवून ठेवलेली दारू महिलांनी एकत्र येऊन पकडली. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

सदर घटना पिपरी येथे दिनांक 19 रोज बुधवार ला घडली. याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी कुंडलिक उरकुडे,राहणार पिपरी याच्यावर गुन्हा दाखल करून दारू व गाडी असा 52 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपी हा गावात नेहमी दारू विकतो. त्याला गावातील महिलांनी याबाबत अनेकदा समज दिली मात्र याकडे आरोपीने दुर्लक्ष केले.

शेवटी पोलीस पाटील सुनीता ठोंबरे यांच्या नेतृत्वात अलका नगराळे, ज्योती खंडाळे, काजल चव्हाण, सरपंच अर्चना नांदे, शालू ढवस, सुरेखा पाटील, कविता मडचापी, रंजना खंडाळे, रवींद्र खुटेमाटे, शंकर खुटेमाटे आदींनी एकत्र येऊन आरोपीकडून दारू पकडून याची माहिती भद्रावती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये