शिक्षक-पालक विशेष सभेत CET, JEE, IISER, NEET मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे सत्र 2024-25 मधील विद्यार्थ्यांसाठी MHT-CET सराव सत्र, मार्गदर्शन व समुपदेशन तसेच सत्र 2025-26 मधील इयत्ता 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य CET मार्गदर्शन, सराव व समुपदेशन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी 11 वी परीक्षेनंतर त्वरित 12 वीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने आयोजित शिक्षक-पालक विशेष सभेस गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय गोरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य साईनाथ मेश्राम उपस्थित होते.
सभेत उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे यांनी MHT-CET, JEE, IISER आणि NEET या स्पर्धा परीक्षांबाबत सविस्तर माहिती पालकांना दिली. त्यांनी या परीक्षांचे स्वरूप, अभ्यासाची योग्य पद्धत, तयारीसाठी महत्त्वाच्या रणनीती तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध संधी यावर मार्गदर्शन केले.
तसेच प्रभाकर कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास नियोजन व सराव तंत्र याविषयी माहिती दिली. यावेळी उपस्थित शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.