क्रिडांगणाच्या मागणीसाठी सावलीकर एकवटले
शहर कळकळीत बंद ; वनविभागावर मोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली शहराकरिता क्रिडांगणा च्या मागणीसाठी सावलीकरानी एकत्र येत (दि 17) रोजी सावली शहर कळकळीत बंद ठेऊन वन विभागावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यात हजारो सावलीकर सहभागी झाले होते.
सावली शहरातील नगरपंचायत हद्दीतील व योगी नारायण बाबा मठ लगतचे मोकळे मैदान स.क. ७९८ याचा वापर सर्व सावलीकर, आबालवृध्द, खेळाडू, पोलीस व सैन्यात प्रवेश ईच्छुक युवक युवती गेल्या पाच वर्षापासुन किडागण म्हणुन करीत आहेत. या मैदानावर गेल्या पाच वर्षात अनेक प्रकारच्या किडा स्पर्धा, पोलीस विभागाची सद्भावना किडा स्पर्धा, पालकमंत्री चषक, नगरपंचायत चषक, सावली प्रिमीअर लिग तसेच अनेक किडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सावली शहराला कोणतेही अधिकृत किडांगण उपलब्ध नसल्याने याच मैदानाचा उपयोग सावलीकर मार्निंग वाक करणे, सायंकाळी फिरणे, पोलीस व सैन्य दलात इच्छुक युवक युवती सरावासाठी तसेच गावातील खेळाडू विविध खेळांचा सराव करण्यासाठी करीत आहेत.
मात्र सावली तालुक्यातील आदिवासी समाज संघटनांनी याच मोकळया मैदानाची मागणी आदिवासी मुले व मुलींच्या वस्तीगृहासाठी वनविभागाकडे केली, त्यांच्या मागणीची दखल घेवून दि. १७/२/२०२५ ला विभागीय वन अधिकारी, वनविभाग चंद्रपूर यांच्या पत्र कं. कक्ष १४/सर्व्हे/जमीन २०१९ अन्वये मौजा सावली येथील सदरचे सर्व्हे क. ७९८ मध्ये किडांगण निर्माण करण्याच्या विरोधात आदिवासी समुदाय असल्याच्या आशयाचे पत्र निर्गमित करण्यात आल्याने प्रशासनाकडुन किडांगणसाठी राखीव असलेली जागा रद्द होणार असल्याची माहिती सावलीकरांना समजली. यामुळे संपुर्ण सावली करांनामध्ये रोष पसरला असुन ज्या मैदानाला तयार करण्यासाठी सावलीतील अनेक युवक युवतींनी परिश्रम घेतले. ते मैदान आम्हालाच मिळाले पाहिजे व त्या ठिकाणी किडांगणच तयार व्हायला पाहिजे अशी सावलीकरांची आक्रमक मागणी सावली करानी केली आहे.
सावली नगरपंचायत हद्दीतील व योगी नारायण बाबा मठ लगतच्या सर्व्हे नं. ७९८ वरील मोकळे मैदान फक्त नियोजीत किडांगणासाठी राखीव असायला पाहिजे व त्याच ठिकाणी किडांगण मंजुर करण्यात यावे या मागणीसाठी सावली येथील वनपरिक्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवेदनाची दखल घेवून तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा यावर कोणतीही कारवाई न झाल्यास यापुढे तिव्र आंदोलन करण्यात येईल अशी आक्रमक भूमिका घेतली.
सावली शहर पेसा अंतर्गत येत नसल्याने योगी नारायण बाबा जवळील मैदान क्रिडांगणा साठीच राखीव राहणार असून त्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरु आहे.
– प्रशांत खाडे
विभागीय वन अधिकारी चंद्रपूर