संजय गांधी निराधार योजनाच्या लाभार्थ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्या
सूरज हनुमंते यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना अर्ज करायचे असतातपरंतु ते अशिक्षित व वयोवृध्द असल्याने अर्ज करतांना मानसिक व शारीरिक त्रास होतो,त्यांच्या या अडचणीचा विचार करून अर्ज सादर करण्यासाठी गावोगावी महा डी बी टी चे कॅम्प घेउन त्यांना सन्मान पूर्वक वागणूक द्यावी.
तसेच या योजनेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द करून तहसिल कार्यालय व संबंधीत ग्राम पंचायत कार्यालयात लावावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा चे संयोजक सूरज हनुमंते यांनी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान मुंढे, ॲड राजू मांटे, ओमकार घुगे, गणेश घुगे, साहिल मोगरकर, विट्ठल निंबाळकर, वैभव जावळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.