ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
उद्या भद्रावतीत प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे भव्य मोर्चाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
प्रती एकर दहा लाख रुपये अनुदान, अडीच एकरामागे एक नोकरी व कंपणी,एमआयडीसी आणी प्रकल्पग्रस्तांमधे त्रीपक्षीय लेखी करार करणे या प्रमुख मागण्यांना घेऊन निप्पान प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे दिनांक १७ रोज सोमवारला सकाळी १० वाजता स्थानिक नागमंदिर पासून ते तहसील कार्यालयापर्यंत प्रकल्पग्रस्त तथा सुशिक्षीत बेरोजगार यांच्या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर तेथे तहसीलदारांमार्फत शासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.
या मोर्चात निप्पान प्रकल्पग्रस्त तथा परीसरातील सुशिक्षीत बेरोजगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली ताकद शासनाला दाखविण्याचे आवाहण संघर्ष समितीतर्फे प्रसिध्दी प्रमुख लिमेश माणुसमारे यांनी केले आहे.