ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोडशी खू पोचमार्गाची दुर्दशा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना – तालुक्यातील कोडशी खुर्द गावाला जाणाऱ्या दोन्ही पोचमार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे खड्डे मय रस्त्यातून ग्रामस्थांना प्रवास करावा लागतो आहे.

कोडशी खू येथे जुना जकात नाका व हेटी वळण रस्ता असे दोन गावात जाणारे प्रमुख पोच मार्ग आहे. परंतु दोन्ही रस्त्यावरील डांबर उखडल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा बांधकाम विभागाकडे मागणी केली.

परंतु आज घडीला दुरुस्ती विषयक कुठलीही पाऊल उचलण्यात आली नाही. परिणामी ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयराव बोर्डे यांनी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये