ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लखमापूर येथे राबविल्या गेले मतदान जनजागृती अभियान 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 मतदान जनजागृती साठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लखमापूर येथे विविध स्पर्धांचे आयोजन 19 ऑक्टोंबर 2024 रोजी. करण्यात आले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ Sveep Activity अंतर्गत मतदान जनजागृतीच्या अनुषंगाने जि.प उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे दि . १९ /१० /२०२४ रोजी निबंध स्पर्धा ,रांगोळी , स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.

सदरच्या स्पर्धेमध्ये शाळेतील १५० विद्यार्थ्यांपैकी तब्बल 100 विद्यार्थ्यांनी तीनही स्पर्धेमध्ये भाग घेतला.

वरील विषयाच्या अनुषंगाने शाळेमध्ये मतदान जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा आयोजन करण्यात आली होतं. स्पर्धा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे गावातील मतदारांना मतदान करण्याचे आव्हान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध चित्रांच्या माध्यमातून रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती अभियान यशस्वी होईल या उद्देशाने प्रयत्न केले.

सदरच्या अभियानामध्ये शाळेतील सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये