ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निप्पॉन डेंड्रो प्रकल्पग्रस्तांना अनुदान द्या

आमदार सुधाकर अडबाले यांची विधानपरिषदेत मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      भद्रावती तालुक्यातील निप्पॉन डेंड्रो प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान व नोकरी देण्यात यावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांची विधानपरिषदेत केली आहे.

भद्रावती तालुक्यात सध्या निप्पॉन डेंड्रो प्रकल्पग्रस्तांच्या समस्या चर्चेचा विषय बनला आहे. निप्पॉन डेंड्रो प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लागाव्या याकरिता शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी त्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला. परिणामी त्यांच्यावर देखील पोलिस प्रशासनाने कायदेशीर केसेस लादल्या. मात्र, प्रशासनाच्या या दडपशाहीसमोर झुकणार नाही, शिक्षक व शेतकरी यांच्यासाठी सदैव लढत राहणार, अशी भूमिका आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतली. याच अनुषंगाने निप्पॉन डेंड्रो प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत आमदार सुधाकर अडबाले यांनी मांडला.

यावेळी त्यांनी सांगितले की, ३० वर्षांअगोदर म्हणजे १९९४ मधे भद्रावती एम.आय.डी.सी. अंतर्गत ३३०० एकर शेतजमीन १२ हजार रुपये प्रति एकर प्रमाणे संपादित करण्यात आली. त्यानंतर या संपादित शेतजमिनीवर इतक्या वर्षात कोणताही प्रकल्प आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची एक पिढी यामुळे गारद झाली. इतक्या वर्षानंतर आता ग्रेटा एनर्जी लि. या खाजगी कंपनीने येथील ५५.०२ हे. आर. जमीन एम.आय.डी.सी. कडून विकत घेतली आहे. प्रकल्पग्रस्त, शेतकरी व गावकरी यांनी गेल्या ३० वर्षात येथील एका पिढीचे जे नुकसान झाले त्याचा मोबदला आधी देण्यात द्यावा, प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान व नोकरी देण्यात यावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी विधानपरिषदेत लावून धरली. शेतकऱ्यांसाठी भविष्यात देखील झटत राहील, असे आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये