ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रामकृष्ण विद्यामंदिर शाळेत जागतिक महिला दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.  प्रा. अशोक डोईफोडे

रामकृष्ण विद्यामंदिर, दे. राजा येथे दि. 08 मार्च, 2025 रोजी ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री जी. एल.व्ही.देशमुख होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती एन. जे. श्रीसुंदर उपस्थित होत्या.

प्रमूख पाहुण्यांच्या हस्ते प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

नंतर प्रमुख पाहुणे यांनी भाषणात ‘जागतिक महिला दिनाच्या’ शुभेच्छा दिल्या व मुलींना जीवनात कठीण परिश्रम करून उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रेरीत केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री.जी. एल.व्ही.देशमुख सरांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम ला शाळेतील सर्वच महिला शिक्षिका उवस्थित होत्या सर्वच महिला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यानंतर श्री के. टी. चव्हान सरांनी उपस्थित मान्यवरांचे,शिक्षकांचे, विदयार्थ्यांचे आभार मानले आणि कार्यक्रमचा समारोप झाला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये