सिमेंट उद्योगाच्या प्रदूषणाची कैफीयत पर्यावरण मंत्र्यांच्या दालनात आमदार भोंगळेनी वेधले लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिकरणाच्या नावावर शेती व मानव जातीच्या आरोग्याच्या परिणामाची दखल आमदार देवराव भोंगळे यांनी गंभीर देणे घेतली असून नुकत्याच माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रदूषणाचे वाईट परिणाम व गडचांदूर शहरासह परिसरातील शेतीवर आलेले संकट उत्पादनावर झालेला परिणाम गावातील नागरिकांच्या आरोग्यावर झालेल्या परिणामाची व मानीकगड कंपनीच्या मुजोरीचे वाभाडे व लहरी कारभाराचे भंडाफोड राष्ट्रवादी कॉग्रेसचे सहसचिव आबिद अली यांनी थुट्रा गोपालपूर शिवारात भेट देऊन प्रदूषणामुळे जल जंगल जमीनीवर होत असलेल्या उपद्रवाचा गावातील आदिवासी शेतकरी सह जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक सह पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आमदार देवराव भोगळे याच्या कडे निवेदन देऊन लक्ष वेघले तक्रारीची दखल घेत आमदार भोंगळे यांनी राजूरा विधानसभा क्षेत्रातील सिमेंट उद्योगाच्या प्रदूषणामुळे शेतकरी संकटात सापडला उत्चादण होत नाही.
शेती करणे कठीण झाले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियंत्रण नसल्याने कंपनी वर वचक नाही मानीकगड सिमेंट कंपनीवर यापूर्वी अनामत ठेव रक्कम जप्त होऊन सुद्धा काहीच परिणाम झाला नाही यामुळे गडचांदूर शहरासह परिसरात नागरीक प्रदूषण धुळीमुळे त्रस्त झाले कंपनी प्रदूषण नियंत्रण करण्यात असमर्थ आहे शेतकऱ्याच्या नुकसानीला कंपनी जबाबदार असल्याने कार्यवाही करूण नुकसान भरपाई द्यावी अशी भुमीका मांडून पर्यावरण मंत्र्यांचे लक्ष वेधून तारांकीत प्रश्नाद्वारे शासनाचे लक्षवेधल्याने खळबळ माजली आहे.