लघु व सूक्ष्म आणि मध्यम व्यवसायिकांकरिता रॅम प्रोजेक्ट अंतर्गत क्षमता बांधणी कार्यक्रम आयोजित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे लघु व सूक्ष्म आणि मध्यम व्यवसायिकांकरिता रॅम प्रोजेक्ट अंतर्गत क्षमता बांधणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये श्री सौरभ मालपाणी यांनी कठीण विषय इनपुट टॅक्स क्रेडिट हा अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सर्व उपस्थित त्यांना समजावून सांगितला आणि जास्तीत जास्त व्यवसायिकांनी इनपुट टॅक्स क्रेडिट चा जास्तीत जास्त कसा लाभ मिळवता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.
तर श्री रोहित सिंग यांनी गव्हर्मेंट ई मार्केट म्हणजेच जेम पोर्टल याबद्दल सविस्तर माहिती समजावून सांगितले आणि तसेच उपस्थिताना पोर्टल चे प्रत्यक्ष माहिती देण्यात आली जेणेकरून लघु उद्योगांना पोर्टल वापरण्याकरिता कोणतेही अडचणी निर्माण होणार नाही. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितानी त्यांच्या कडे असणाऱ्या शंका त्यांनी मार्गदर्शकांना विचारले आणि त्यांच्या प्रश्नांचे निरासरण करून घेतले. या कार्यक्रमाकरिता जवळपास 40 लघुउद्योजक कार्यक्रमासाठी हजर होते.