ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजाचे क्रिडा क्षेत्रात नेत्रदीपक यश

चांदा ब्लास्ट

तालुका क्रीडा संकुल, देऊळगाव राजा येथे ८ व ९ सप्टेंबर रोजी तालुका स्तरीय शालेय मैदाणी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यात देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजा येथील खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.

१४ वर्ष वयोगातील गोळाफेक, व थाळी फेक स्पर्धेत कुणाल पवार याने प्रथम क्रमांक पटकावला

१०० मिटर धावणे स्पर्धेत करण चित्ते याने प्रथम क्रमांक पटकावला.

१७ वर्ष वयोगटातील थाळीफेक व गोळा फेक स्पर्धेत जयवर्धन सोळंके याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

१०० मिटर धावणे तसेच ११० मिटर हर्डल्स स्पर्धेत यश हुसे याने प्रथम क्रमांक पटकावला.

१९ वर्ष वयोगटातील ४०० मिटर धावणे स्पर्धेत मुलामधून पार्थ झोरे प्रथम आला. भालाफेक मध्ये क्षितिज पाचरणे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सर्व विजेत्या खेळाडूंचे व पालकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, व सर्व सदस्यांनी केले आहे. शाळेचे मुख्याध्यापक आर बी कोल्हे, पर्यवेक्षक जाधव, ज्येष्ठ शिक्षिका सौ मल्लावत मॅडम यानी सर्व विजेत्या खेळाडूंचे व पालकांचे पुष्गुच्छ देऊन अभिनंदन करून जिल्हास्तरावरील क्रिडा स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये