ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवाग्राम चौकात सट्टापट्टीचा जुगार खेळणाऱ्यांवर सेवाग्राम पोलीसांची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन, सेवाग्राम अंतर्गत मौजा सेवाग्राम चौकात लोकांकडून पैसे स्विकारून सट्टापट्टीचा हारजितचा जुगार खेळणारे 1)नरेंद्र नारायण शिरपुरकर वय 58 वर्ष 2)शुध्दोधन कवडूजी बेसेकर वय 50 वर्ष दोन्ही रा. हावरे ले-आउट, सेवाग्राम यांचेवर महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये कार्यवाही करण्यात आली.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराज जैन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदर्शनात श्री. विनित घागे ठाणेदार पोलीस स्टेशन सेवाग्राम यांचे निर्देशाप्रमाणे पो. हवा. हरिदास काकड, पो.ना. संजय लाडे पो. अमंलदार अभय इंगळे, प्रदीप कुचनकर यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये