श्री संत गजानन महाराज मंदिर येथे प्रगट दिन मोठया उत्साहात साजरा
हजारो भाविकांनी महाप्रसादचा लाभ घेतला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री संत गजानन महाराज मंदिर, कुंभारी येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
13 फेब्रुवारी पासुन मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
20 फेब्रुवारी रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप ह भ. प संत चरणदास महाराज गुरुवर्य निकम गुरूजी यांच्या काल्याच्या किर्तनाने झाला. त्यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले, हजारो भाविकांनी महाप्रसाद चा लाभ घेतला.
पहाटे पाच वाजता श्री पालखी मिरवणूक काढण्यात आली,यात दिंडिकरी व भक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते, टाळ मृदंगाच्या गजरात निघालेल्या दिंडीचे जागोजागी स्वागत करण्यात आले, भाविकांनी दर्शन घेतले. सेवाभावी भक्तांनी दिंडिकरासाठी नाष्टा पानीची सोय केली होती.
मंदीरात पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी होती.
शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.