ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

28 फेब्रुवारी रोजी नागपुर येथे अकरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी दहा वाजता नंदनवन जवाहर विद्यार्थी वसतिगृह हॉल, नागपूर येथे अकरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे ज्या कवींना स्पर्धेत किंवा केवळ कविता सादर करण्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी त्वरित ९८१९३ २१५५६ या व्हॉटस् अप नंबर वर आपले संपूर्ण नाव, व्हॉटस् अप नंबर आणि शहराचे नाव लिहून नोंदणी करावी.

पहिल्या ३० कवींना स्पर्धेत स्थान देण्यात येईल त्यानंतर आलेल्या नावांचा विचार स्पर्धेसाठी करता येणार नाही परंतु त्यांना कविता सादर करण्यासाठी सहभाग घेता येईल याची नोंद घेऊन लवकरात लवकर वर दिलेल्या नंबरवर नोंदणी करावी असे आवाहन आयोजक मराठी साहित्य मंडळ च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव वर्षा थोरात यांनी केले आहे.

( #वि. #सू… कविता नोंदी साठी किंवा कविता सादरीकरणासाठी मंडळ कुठलेही शुल्क आकारणी करत नाही…) याची विशेष नोंद घ्यावी

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये