ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसमध्ये रवीना टंडनच्या आगमनाने राजकीय वातावरण तापले

भाजपात गटबाजीचे संकेत?

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : घुग्घुस शहरात “मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. १५ फेब्रुवारी, शनिवार रोजी संध्या. ६ वाजता हा कार्यक्रम मीना बाजार ग्राउंड, बँक ऑफ इंडिया रोड, घुग्घुस येथे होणार आहे.

कार्यक्रमाला माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार आणि राजुराचे आमदार देवराव भोंगळे उपस्थित राहणार आहेत.

भाजपच्या इतर आमदारांच्या अनुपस्थितीवरून चर्चा सुरू

या महोत्सवात भाजपच्या काही महत्त्वाच्या नेत्यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे पक्षाच्या आंतरिक गटबाजीचे संकेत मिळत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

घुग्घुसमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींच्या उपस्थितीवरून राजकारण तापले

यावर्षी घुग्घुसमध्ये दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये अभिनेत्रींना आमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे भाजपच्या दोन गटांमध्ये स्पर्धा वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

घुग्घुसमध्ये एकीकडे आमदार किशोर जोरगेवार यांचे कार्यालय आहे, तर दुसरीकडे सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र कार्यरत आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी बॅनरवरून नाराजी दर्शवली आहे, असे सूत्रांकडून समजते. त्यामुळे घुग्घुसमध्ये भाजपच्या अंतर्गत संघर्षाची चर्चा अधिकच जोर धरू लागली आहे.

दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होणारा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

१४ व १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या महोत्सवात दरवर्षी सिनेअभिनेत्रींना आमंत्रित केले जाते. याआधी मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि प्राजक्ता माळी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यंदा बॉलिवूडची सुपरस्टार रवीना टंडन या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहेत.

हा कार्यक्रम प्रयास सखी मंच घुग्घुस आणि भाजप महिला आघाडी घुग्घुस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

भाजपच्या नव्या समीकरणांकडे सर्वांचे लक्ष

घुग्घुसमध्ये नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये या महोत्सवाबाबत उत्साह दिसून येत आहे. मात्र, हा कार्यक्रम भाजपच्या अंतर्गत नव्या समीकरणांना चालना देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये